Ad will apear here
Next
‘गोगटे-जोगळेकर’च्या मराठी वाङ्मय मंडळाचे यश
प्रमाणपत्रांसह गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाचे विद्यार्थी.

रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांच्या वतीने साडवली (देवरुख) येथे जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या पाच विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. काव्यवाचन स्पर्धेत विजय सुतार आणि एकपात्री अभिनय स्पर्धेत स्मितल चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हे दोन विद्यार्थी एक व दोन फेब्रुवारी २०१९ रोजी राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत ‘गोगटे-जोगळेकर’चे प्रतिनिधीत्व करतील.

२०१८-१९ हे वर्ष कवी, नाटककार राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष; तर महाकवी ग. दि. माडगुळकर (गदिमा) आणि सिद्धहस्त लेखक पु. ल. देशपांडे (पुलं) यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने या तीन साहित्यिकांच्या लेखनावर आधारित राज्य मराठी विकास संस्थेने राज्य पातळीवर या दोन्ही स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन गटात घेण्यात येत आहेत.

जिल्हा समन्वयक वैदेही सावंत यांच्यासह विजेते विद्यार्थी विजय सुतार व स्मितल चव्हाण

२१ जानेवारीला साडवली येथे झालेल्या महाविद्यालयीन जिल्हास्तर स्पर्धेत ‘गोगटे-जोगळेकर’च्या मराठी वाङ्मय मंडळाच्या पुढील विद्यार्थ्यांनी बक्षिसांची कमाई केली. काव्यवाचन स्पर्धा- विजय सुतार (प्रथम, तीन हजार रुपये व पुस्तक), अस्मिता गोखले (द्वितीय, अडीच हजार रुपये व पुस्तक). एकपात्री अभिनय स्पर्धा- स्मितल चव्हाण (प्रथम, तीन हजार रुपये व पुस्तक), चतुर्थ- दीप्ती वहाळकर (दीड हजार रुपये व पुस्तक), पंचम- श्रेया जोशी (एक हजार रुपये व पुस्तक) अशी पारितोषिके प्राप्त केली.

विजय सुतार याने ‘गदिमां’ची ‘जोगिया’ ही कविता सादर केली. अस्मिता गोखले हिने गोविंदाग्रजांची ‘प्रेम आणि मरण’ ही कविता सादर केली. स्मितल चव्हाण हिने ‘पुलं’च्या ‘सुंदर मी होणार’मधील दीदीची भूमिका साकारली. दीप्ती वहाळकर हिने ‘पुलं’च्या ‘घरगुती भांडणे’ या विनोदी लेखावर अभिनय केला. श्रेया जोशी हिने ‘पुलं’ची ‘फुलराणी’ साकारली. या विद्यार्थ्यांसाठी मराठी वाङ्मय मंडळाच्या डॉ. निधी पटवर्धन यांनी विशेष मेहनत घेतली होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि  रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZJVBW
Similar Posts
‘गोगटे-जोगळेकर’ला पावणेदोन लाखांची पारितोषिके महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित रंगवैखरी या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची महाअंतिम फेरी सहा जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. महाराष्ट्र आणि बेळगाव केंद्रातून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या सात संघांचे नाट्याविष्कार या वेळी झाले
डॉ. पटवर्धन मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी गाइड रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निधी पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी गाइड म्हणून मान्यता मिळाली.
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले
विद्यार्थ्यांनी लिहिले भारतमातेला पत्र रत्नागिरी : रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतमातेला अनोखी ‘पत्ररूपी’ भेट दिली. व्हॉट्सअॅपच्या युगात पत्र लिहिण्याचा विसर पडला असल्याने मराठी विभागाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन पोस्ट कार्डावर पत्र लिहिण्यास प्रवृत्त केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language